नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): उपनगर पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने गस्ती दरम्यान तीन जाणाकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतूस जप्त केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पदाची सूत्र घेतल्या नंतर ची पहिली मोठी कारवाई गुन्हे शोध पथकाणे केली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथक रात्री गस्त घालीत असतांना नाशिक पूणे महामार्ग येथील इच्यामणी लॉन्स जवळील मैदान येथून शुभम अशोक जाधव (वय 23), सचिन धर्मा सोनवणे (वय 24), गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी (वय 24) राहणार समतानगर, उपनगर नाशिक यांना ताब्यात घेऊन यांच्या कडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतूस जप्त केले.
सदर कारवाई उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, हवालदर विनोद लखन,गुंड,इमरान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सूरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, सैरभ लोंढे यांनी केली.
27 Total Views , 1 Views Today