नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी मूर्ती विसर्जनासाठी अडचणी निर्माण होऊ यासाठी महानगरपालिकेमार्फत 23 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर जागांचे ‘विघ्नहर्ता’ या ॲपद्वारे ऑनलाईन मॉनेटरींग करण्यात येत आहे. कोविड रूग्णालयांमध्ये बिलांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या बिटको व झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टँकची व्यवस्था करण्यात येत असून बिटको रूग्णालयात अतिदक्षता विभाग व ऑक्सिजन मिळून 200 बेडस् तयार करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोविड केअर सेंटर मध्ये सद्यस्थितीत 1 हजार 117 बेड शिल्लक आहेत, त्याप्रमाणे झिरो मिशन अंतर्गत आतापर्यंत 45 हजार लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी साधारण साडेपाच हजार पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तसेच शहारातील झोपडपट्टी भागातील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली