धक्कादायक: नाशिकला एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरातील सराफ नगर मध्ये पती -पत्नीने त्यांच्या ९ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली. येथील लेन क्रमांक २ मध्ये खाजगी कंपनीत कामाला असलेले विजय सहाणे (३६) , पत्नी ज्ञानेश्वरी सहाणे (३२) , ३ री ला असलेली मुलगी अनन्या (९) हे वडील माणिक सहाणे आणि आई लीलाबाई यांच्या समवेत दुमजली प्रतिगंगा रो हाऊस नंबर १ मध्ये वास्तव्यास होते.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

सकाळी आठ वाजेच्या सुमारास आपली नात शाळेत जाण्यासाठी अजून खाली आली नाही म्हणून माणिक सहाणे त्यांना बघण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मात्र दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बराच वेळ दार ठोकून बघितले. काहीही उत्तर मिळत नसल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली आणि त्यांनी मदतीसाठी समोरच राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना बोलावले.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तुटला नाही. येथे रोज दूध वाटण्यासाठी येणाऱ्यानी मग दरवाजा तोडला आणि सर्वांनी खोलीत प्रवेश केला. त्यावेळी विजय, ज्ञानेश्वरी आणि अनन्या मृतावस्थेत आढळून आल्याने घरात एकच आराडा ओरडा सुरु झाला. जवळच राहणारे विजय यांचे मोठे बंधू जगन आणि परिसरातील रहिवासीयांनी तात्काळ घराकडे धाव घेतली.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

इंदिरानगर पोलिसांना माहिती देण्यात आली. तिघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी या त्रिकोणी कुटुंबाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790