नाशिकमध्ये घरात भीषण स्फोट! घराच्या काचा फुटल्या, तीन जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात भीषण स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत.

त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा त्याचप्रमाणे आजूबाजूच्या घरांच्या काचाही फुटल्या. या स्फोटामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली.

सदर स्फोट हा मोबाईलमुळे झाल्याची चर्चा होती. मात्र फक्त मोबाईलच्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण कशी असू शकते असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिकच्या टीमने ही घटनास्थळावरून नमुने घेतले आहे. त्यामुळे फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतरच स्फोटाचे नक्की कारण समजू शकेल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790