नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदी जवळील भैरवनाथ मंदिराजवळ एका २९ वर्षाच्या युवकाने आपल्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आ त्म ह त्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप नाना सहाणे (वय २९) असे गोळी झाडून आ त्म ह त्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आज सकाळी त्याने पळसे येथील दारणा नदीजवळ असलेल्या भैरवनाथ मंदिर येथे बंदुकीच्या सहाय्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आ त्म ह त्या केली.
त्यानंतर सदरची घटना नातेवाईक व नागरिकांना समजताच त्यांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे तातडीने दाखल झाले व झालेल्या घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, संदीप सहाणे याने आ त्म ह त्या का केली याबाबतचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कौटुंबिक वादातून त्याने आ त्म ह त्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्या युवकाकडे पिस्तुल कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत.
![]()


