उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदांच स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वी !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (वाणिज्य प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे स्वॅप किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. स्वॅप किडनी प्रत्यारोपण  हि दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. कारण यामध्ये दोन पेशंट आणि त्यांचे दोन डोनर यांचा सहभाग महत्वाचा असून चारही जणांचे एकमत, स्थिरता आणि होकार या गोष्टी महत्वाच्या आहे. स्वॅप किडनी प्रत्यारोपण हि शस्त्रक्रिया करण्यात अपोलो हॉस्पिटल, नाशिक च्या टीमला यश आले आहे.

अपोलो हॉस्पिटलचे किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. प्रकाश उगले यांनी सांगितले की, डायलिसिस चे रुग्ण  श्री. नानासाहेब शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. स्मिता शिंदे यांचा दोघांचा रक्तगट वेगळा होता. तसेच दुसरे डायलिसिस चे रुग्ण श्री. राहुल महाजन आणि त्यांच्या पत्नी सौ. सोनिया महाजन या दोघांचा रक्तगट वेगळा होता. दोन्ही रुग्णांचे डायलीसीस हे अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे सुरु होते. दोन्ही पेशंट आणि त्यांच्या पत्नी यांचे रक्तगट आपापसांत क्रॉस जुळत असल्याने त्यांना स्वॅप ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी दोन्ही रुग्ण आणि त्यांच्या पत्नीकडून होकार देण्यात आला. दोन्ही रुग्ण, त्यांच्या पत्नी, नातेवाईक यांचे शंका निरसन करून शस्त्रक्रिया करण्याचा योग्य निर्णय तातडीने घेण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

युरोसर्जन डॉ. किशोर वाणी म्हणाले “दोन्ही रुग्णांचे आणि त्यांच्या पत्नीचे (डोनरचे) रक्तगट आपापसांत क्रॉस जुळत असले तरी सर्व रिपोर्ट्स व्यवस्थित आल्याने स्वॅप ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया हि सुरळीतपणे पार पडली. डायलिसिस वर रुग्ण खूप दिवस ठेवणे कठीण असते. बऱ्याच वेळी घरातील व्यक्ती किडनीदाता म्हणून पुढे आली तरी रक्तगट जुळत नाही. अशा वेळी स्वॅप ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि वरदान ठरते.”

अपोलो हॉस्पिटल्स चे युरोसर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने म्हणाले की, “स्वॅप ट्रान्सप्लांट साठी मोठी टीम लागत असून हे ऑपेरेशन एकाचवेळी करावी लागतात. हे स्वॅप ट्रान्सप्लांट यशस्वीरीत्या पार पडले व कुठलीही गुंतागुंत उदभवली नाही. अशा स्वॅप ट्रान्सप्लांट चा बऱ्याच किडनी निकामी झालेल्या रुग्णांना फायदा मिळेल.”

अपोलो हॉस्पिटलचे युरोसर्जन डॉ. अमोल पाटील म्हणाले की. स्वॅप ट्रान्सप्लांट हि शस्त्रक्रिया म्हणजे घरातील ज्या डोनरचा पेशंटला रक्तगट जुळत नाही अशा रुग्णांसाठी स्वॅप ट्रान्सप्लांट हि संजीवनी आहे. यामध्ये अनेक पेशंटला याचा फायदा होऊ शकतो. रक्तनात्यातील डोनर हा स्वॅप ट्रान्सप्लांट करू शकतो.

अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड श्री. अजित झा म्हणाले कि स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हि उत्तर महाराष्ट्रात प्रथमतः करण्यात आली. यावेळी चारही जणांनी एकमेकांवर दाखवलेला विश्वास, तत्परता, होकार या गोष्टींमुळे हि शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सरकारकडून यासाठी परवानगी घेण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण ॲड.  नानासाहेब गंगाधर शिंदे पाटील म्हणाले “माझे २०१० मध्ये  जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले होते तेरा वर्ष ट्रान्सप्लांट किडनीने साथ दिली परंतु २०२३ दिवाळीमध्ये किडनीचे कामकाज कमी झाले मी अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे किडनी तज्ञ व नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश उगले यांची ट्रीटमेंट सुरू केली व माझे पुन्हा डायलिसिस सुरू झाले. किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला त्यांनी दिला परंतु घरातील सदस्यांचा रक्तगट जुळत नव्हता. यावेळी माझी पत्नी सौ. स्मिता शिंदे ह्या पुढे आल्या, परंतु रक्तगट जुळत नसल्याने स्वॅप ट्रान्सप्लांट करायचे ठरले. डॉ.उगले सरांनी एक दिवस मला फोन करून धुळे येथील राहुल महाजन व त्यांच्या पत्नीचा संदर्भ दिला. त्यांनाही स्वॅप ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला होता. त्यांची ट्रीटमेंट अपोलो हॉस्पिटल येथे चालू होती डॉ.उगले सरांनी दोन्हीही परिवारांची मीटिंग अपोलो हॉस्पिटल येथे घेतली. मीटिंगमध्ये सकारात्मक चर्चा झाली. पेशंट व डोनर यांचे सर्व रिपोर्ट्स चांगले आले व सरकारी परवानगी त्वरित मिळून २२ एप्रिल २०२४ रोजी राहुल महाजन व मी नानासाहेब शिंदे यांचे किडनी ट्रांसलेट ऑपरेशन झाले. माझे डोनर म्हणून सौ सोनिया राहुल महाजन तसेच राहुल महाजन यांचे डोनर म्हणून सौ स्मिता नानासाहेब शिंदे यांनी किडनी दान केले  आज एक महिना पूर्ण झाले आहे चारही पेशंट यांची शारीरिक परिस्थिती अतिशय चांगली आहे चारही पेशंट वर शस्त्रक्रिया यशस्वी झाली सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. परमेश्वराचे आशीर्वाद तसेच डॉ प्रकाश उगले यांनी दिलेले वैद्यकीय योगदान, पॉझिटिव्ह अप्रोच व अवयव प्रत्यारोपण समन्वयक  सौ .चारुशीला जाधव यांची सकारामक्त मदत यामुळे अवघड असा विषय सोपा झाला. अपोलो हॉस्पिटलच्या सर्व विभागाची फार मदत झाली. डॉ. प्रकाश उगले सर हे आमच्या दोन कुटुंबा करीता परमेश्वराच्या रूपाने आमच्याबरोबर उभे राहिले त्यांचे ऋण आम्ही जन्मभर विसरू शकत नाही अथवा फेडू शकत नाही आजही फोन करून आमच्यावर त्यांचे लक्ष आहे, डॉ. प्रकाश उगले  व अपोलो हॉस्पिटल नाशिक यांच्या मार्फत अनेक किडनी विकाराच्या रुग्णांना सहकार्य मिळावे  व पीडितांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा याकरिता आपल्या सर्व घटकांना  परमेश्वर शक्ती देवो ही प्रार्थना.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790