नाशिक: दीड लाखांची लाच घेतांना पुरातत्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे व नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.७) रंगेहात पकडले. गर्गे यांनी लाचेच्या रकमेमधून हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारास कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिक सहायक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत सहायक संचालक पुरातत्त्व व संग्रहालय कार्यालयाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहायक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी (दि. ६) दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

⚡ हे ही वाचा:  महाराष्ट्रात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या आदेशान्वये सापळा रचण्यात येऊन तडजोडअंती लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारली असता पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी व सुवर्णा हांडोरे यांनी ही कारवाई केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

आळे यांनी पुरातत्त्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस मदन गर्ने यांना लाच स्वीकारल्याची माहिती देत त्यांच्या हिश्श्याचे पैसे कोणाकडे देऊ असे कळविले असता हिश्श्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली. यामुळे गर्गे यांच्याविरुद्धही इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसूती रजेवर असताना घेतली लाच:
आरती आळे या प्रसूती रजेवर आहे. त्यांनी राहत्या घरी अनमोल नयनतार गृहप्रकल्पातील फ्लॅट क्रमांक १७ मध्ये दीड लाख रुपये स्वीकारले. यानंतर वरिष्ठ अधिकारी राज्याचे संचालक गर्गे यांना याबाबत माहिती देऊन हिश्शाबाबत विचारणा केली. गर्गे यांनी त्यास संमती दर्शविल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790