आता नाशिक शहर पोलीस एक्शन मोड मध्ये आले आहेत.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पोलीस कारवाईच करत नसल्याचा सूर येत होता. त्यामुळे आता नाशिक शहर पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.
अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल गंगोत्री बार या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई केली.
पोलीस उप आयुक्त विजय खरात परिमंडळ 2 नाशिक शहर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते विभाग 3 नाशिक शहर पोलीस निरीक्षक गुन्हे कमलाकर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस स्टेशन कडील पोलीस अमलदार असे नाशिक महानगरपालिका यांच्यासोबत हॉटेल गंगोत्री बार मधील एकोणवीस लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारणी करण्यात आली व सदर हॉटेल गंगोत्री बार हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे