नाशिक: बसच्या धडकेमध्ये मोपेडवरील युवक ठार; शहरातील ‘या’ सिग्नलवरील घटना

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावरील काठेगल्ली सिग्नल येथे भरधाव वेगातील परिवहन महामंडळाच्या बसने ट्रीपलसीट मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये पाठीमागे बसलेला २३ वर्षीय युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल ज्ञानेश्वर उर्फ नाना बेंडकुळे (२३, रा शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डी रोड) असे अपघातात मयत युवकाचे नाव आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अंमलदार शरद अर्जून देवरे यांच्या फिर्यादीनुसार, मोपेडचालक आकाश अरुण वार्डे, राम नाना वाघ व राहुल बेंडकुळे हे तिघे मोपेडवरून (एमएच १५ जेजी २१६३) बनकर चौकाकडून नागजी चौकाकडे येत होते.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

त्याचवेळी नाशिकरोडकडून भरधाव वेगात परिवहन महामंडळाची बस (एमएच ०४ एलक्यु ९४५८) येत होती. काठेगल्ली सिग्नल येथे मोपेड वाहन रस्ता ओलांडत असतानाच, भरधाव वेगातील बसने मोपेडला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये आकाश व राम यांना किरकोळ दुखापत झाली. तर पाठीमागे बसलेला राहुल मात्र गंभीररित्या जखमी झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

हे ही वाचा:  नाशिक: नवनवीन गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांची भूमिका आव्हानात्मक- न्यायाधिश जगमलानी

तर याप्रकरणी बसचालक शरद अर्जून देवरे (रा. नागापूर रोड, ता. नांदगाव) यांच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्यासह अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक वाघ हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790