नाशिक: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत मोपेडवरील ६६ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना दिंडोरी रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दादासाहेब रंगनाथ थोरात (वय ६६) हे एमएच १७ एआर ८८८५ या क्रमांकाच्या अॅक्टिव्हा मोपेडने आकाश पेट्रोल पंपाकडून म्हसरूळकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या जीजे १७ एसएक्स ९५५५ या क्रमांकाच्या ट्रकवरील चालकाने थोरात यांच्या अॅक्टिव्हाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पाठीमागून ठोस मारली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

त्यात मोपेडचालकाला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक खबर न देता पळून गेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंद्रूपकर करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here