HomeAd

नाशिक: सीबीएसवर बसच्या धडकेत महिला ठार

नाशिक (प्रतिनिधी): सीबीएस परिसरात भरधाव बसने धडक दिल्याने ५० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना घडली. लता रामदास चव्हाण (रा. लेखानगर सिडको) असे मृत महिलेचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.चव्हाण या मंगळवारी सकाळच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी सीबीएस बसस्थानकात प्रवेश करीत असतांना हा अपघात झाला.

रस्ता ओलांडून त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जात असतांना सीबीएस मध्ये भरधाव शिरणा-या बसने त्यांना जोरदार धडक दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित; कधी होणार सुरळीत, जाणून घ्या सविस्तर…

या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने बसचालक अशोक शिंदे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता अवघ्या काही तासातच उपचार सुरू असतांना डॉ. शुभी भटनागर यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790