LPG

नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): खाजगी बसच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जखमी युवकास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव गायधनी (वय: १९) व त्याचा मित्र ऋषिकेश गायधनी (दोघेही राहणार पळसे) हे यांची मोटरसायकल (एम एच 15 बीवाय 0337) ने जात असताना खाजगी कंपनीची बस क्रमांक एम एच 15 जीव्ही 5796 ने नागमोडी वळणावर मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

पाथर्डी रस्त्यावरील हॉटेल स्पाईसी तडका समोर संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. यात वैभव गायधनी याच्या छातीला, बरगडीस, पाठीला तसेच डोक्याच्या खाली जखम झाली असून त्याचा मित्र ऋषिकेश गायधनी याच्या डोक्यावरून बसचे पुढची चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोडाऊनमधील ४.५ लाखांच्या वायर चोरीचा उलगडा; दोघे जेरबंद !

याबाबत इंदिरानगर पोलिसांना माहिती मिळतात पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संशयित बस चालक पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस हवालदार के. आर. पवार पुढील तपास करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३८६/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790