नाशिक (प्रतिनिधी): रथचक्र येथे रस्त्याच्या कडेने जात शतपावली करत असलेले दीपक पाठक व नीता पाठक यांना मागून आलेल्या भरधाव कारने (एमएच १५, जेएक्स ०२७५) धडक देत जवळपास २० फुटांपर्यंत फरपटत नेले.
नीता या बाजूला पडल्या तर दीपक हे फेकले गेले. सोमवारी (दि. २) घडलेल्या या अपघातानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा शनिवारी (दि. ७) मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नीता यांच्या तक्रारीनुसार कारचालकाविरोधात हीट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर राजसारथी सोसायटीरोड, महाविद्यालय, वडाळा-पाथर्डी वाहनधारकांविरोधात गुरू गोविंदसिंग रोडवर चर्चरोड, अशा कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790