नाशिक: स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या; एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): दोन मोटारसायकली स्पीड ब्रेकरवर तोल गेल्यामुळे एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तथागत गौतम सोनवणे (रा. दत्तनगर, अंबड, मूळ रा. बागलाण) याचा भाऊ आदर्श सोनवणे हा त्याचा मित्र रोहित भडांगे याच्यासोबत नांदूर नाक्याकडून छत्रपती संभाजीनगर मार्गे द्वारका असे फिर्यादीच्या राहत्या घराकडे येत होते. फिर्यादीचा भाऊ आदर्श हा एमएच १५ एचव्ही ४२०६ व रोहित भडांगे हा एमएच १५ एचएफ ६६४३ या क्रमांकाच्या दुचाकीने छत्रपती संभाजीनगर नाका येथे आले असता तेथे असलेल्या स्पीड ब्रेकरवर या दोन्ही गाड्यांचा तोल गेला व या दोन्ही गाड्या भरधाव वेगात असल्यामुळे एकमेकांना धडकल्या.

हे ही वाचा:  थंडीचा जोर ओसरला; राज्यात तीन दिवस पावसाची चिन्हे

त्यात आदर्श सोनवणे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५६/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790