नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल भागात भरधाव ऑटोरिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली. अर्चना रविंद्र पाटील (३६ रा. चामुंडा नगर,अशोकनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाटील या गेल्या बुधवारी (दि.२९) मेडिकल कॉलेज येथून आपल्या घरी दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला.
त्र्यंबकरोडने त्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना आयटीआय सिग्नल परिसरात समोरून भरधाव आलेल्या अज्ञात ऑटोरिक्षाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
कुटुंबियांनी त्यांना तातडीने मुंबईनाका येथील सोहम हॉस्पिटल येथे दाखल केले असता शुक्रवारी उपचार सुरू असतांना डॉ. विजय थोरात यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ. भाग्यश्री पवार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक घारे करीत आहेत.