नाशिक (प्रतिनिधी): भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोल पंप परिसरात झाला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दादासाहेब रंगनाथ थोरात (६६ रा.नंदनवन अपा.नायर पेट्रोलपंपा मागे म्हसरूळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. थोरात शुक्रवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास दिंडोरीरोडने आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात झाला. आकाश पेट्रोलपंप भागात पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात आयशर ट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात थोरात रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले होते.
मुलगा अरविंद थोरात यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या सिनर्जी हॉस्पिटल मार्फत अपोलो रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. प्रसाद रौंदळ यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.