नाशिक: भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत ३९ वर्षीय सायकलस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी):  भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत ३९ वर्षीय सायकलस्वार ठार झाला. हा अपघात त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी समोर झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

तेज बहादूर महारा (३९ रा. विकास कॉलनी, महात्मानगर) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. महारा रविवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकरोडने आपल्या सायकलवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पोलीस अकादमीसमोर भरधाव त्र्यंबकेश्वर-पेठ एमएच १५ एन ८८२२ या बसने सायकलला धडक दिली.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

या अपघातात महारा यांना गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रूग्णालया मार्फत त्यांना सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे हलविले असता उपचारापूर्वी डॉ. संदेश पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जयवंत बागुल करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790