नाशिक: ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने ५३ वर्षीय दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर मखमलाबाद रोडवरील हॅाटेल ग्रेप अ‍ॅम्बेसी भागात ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने ५३ वर्षीय सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला. प्रज्ञा आनंद दिक्षीत (रा.प्रमोदनगर,गंगापूररोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

प्रज्ञा दिक्षीत शुक्रवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास गंगापूर ते मखमलाबाद रोडने आपल्या सायकलवरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. हॅाटेल ग्रेप अ‍ॅम्बेसी समोर पाठीमागून भरधाव आलेल्या डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टरने त्यांना ओव्हरटेक केले यावेळी ट्रॅक्टरचा दुचाकीस धक्का लागल्याने त्या पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली आल्या होत्या.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

या घटनेत त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांना रत्नाकर चौरे यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास फुगे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790