नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने बुधवारपासून (दि. ८) चक्री बससेवा सुरू करण्यात येत आहे. निमाणी ते निमाणी अशी ही चक्री बससेवा असणार आहे. शहरातील तसेच पालिका हद्दीपासून २० किमीपर्यंतच्या विविध मार्गावर बससेवा पुरविण्यात येते.
काही दिवसांपासून प्रवाशांची मागणी लक्षात घेत आता सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने चक्री बससेवा सुरू करण्यात येत आहे. एकूण ४ बसेसच्या माध्यमातून निमाणी ते निमाणीमार्गे केटीएचएम व निमाणी ते निमाणी मार्गे सिम्बायोसिस अशा दोन मार्गांवरून ही चक्री बससेवा सुरू राहील.
चक्री बससेवेचा मार्ग असा १) मार्ग क्र. ४०१ ए:
मार्ग: निमाणी ते निमाणीमार्गे सीबीएस, त्रिमूर्ती, सिम्बॉयसिस, अंबडगाव, एक्सलो, पपया नर्सरी, सातपूर, बारदान फाटा, केटीएचएम, रविवार कारंजा.
वेळ: ०७:०५, ०८:०५,०९:०५, १०:०५, ११:०५, १२:०५, १३:३५, १४:३५, १५:३५, १६:३५, १७:३५, १८:३५
2) मार्ग क्रमांक ४०२ बी:
मार्ग: निमाणी ते निमाणीमार्गे सीबीएस, केटीएचएम, बारदान फाटा, सातपूर, अंबडलिंक रोड, एक्सलो, अंबड, सिम्बायोसिस, त्रिमूर्ती, सिव्हिल, रविवार कारंजा.
वेळ: ०७:००, ०८:००, ०९:००, १०:००, ११:००, १२:००, १३:३०, १४:३०, १५:३०, १६:३०, १७:३०, १८:३०
![]()


