
नाशिक (प्रतिनिधी): आडगाव येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे. तर एक महिला आणि एक पुरुष अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी म्हणजेच ४ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस हवालदार शेरखान पठाण व पोलीस हवालदार गणेश वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक महिला ही निर्माण नक्षत्र बिल्डींग, कपालेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर रोड येथे काही महिलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल (पी.सी.बी.एम.ओ. बी-मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर) व त्यांचेकडील पथकाने सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचांसमक्ष छापा कारवाई केली असता, अनैतिक देहव्यापार चालविणारी एक महिला व जाफर मन्सुरी याने अनैतिक देहव्यापाराच्या व्यवसायाकरीता आणलेल्या ०२ पिडीत मुली या सदर ठिकाणी मिळुन आल्या.
सदरच्या २ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली असुन, पिडीतांना वर नमुद महिला व इसम यांनी स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मसाजच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्याकरीता भाग पाडले म्हणुन त्यांचेविरूद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे गुरनं. २४७/२०२४ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आडगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी करीत आहे.
सदरची कारवाई संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त), प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके (सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी एमओबी मध्यवर्ती गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक पंडीत अहिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड, सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, हवालदार शेरखान पठाण, गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, अंमलदार प्रजीत ठाकुर, महिला पोलीस नाईक मनिषा जाधव, महिला पोलीस शिपाई वैशाली घरंटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे, चालक विजय रायते यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.
![]()

