नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील वाढते कोरोना रुग्ण संख्या बघता सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णास बेड मिळण्यास अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दररोज विविध खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने रविवारी (दि. ११ एप्रिल) एकूण १९९ बेड वाढवण्यात आले असून त्यापैकी १४९ हे ऑक्सीजन बेड असून २२ आय सी यु बेड आहेत. तसेच नव्याने २८ व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे व सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांचे पथकामार्फत दैनंदिन रुग्णालयांचा सर्व्हे करून सी बी आर एस सिस्टिम अपडेट करण्याचे कामकाज सुरू आहे.
तसेच नव्याने रुग्णालयातील बेड संख्या वाढविण्याचे कामकाज देखील सुरू आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही बाबतीत घाबरून न जाता नाशिक मनपाच्या या 9607623366 दूरध्वनी क्रमांकावर फोन करून आपल्याला आवश्यक असणारा बेड रुग्णालयात मिळू शकेल.