नाशिकच्या ओझर विमानतळावर ९ वर्षांत प्रथमच एका दिवसात १३०६ प्रवासी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या ओझर विमानतळावरून एका दिवसात प्रवास करणाऱ्यांची संख्या मंगळवारी (दि. २४) विमानतळ सुरू झाल्यापासून अर्थात २०१५ सालानंतर प्रथमच १३०६ झाली. यापैकी ६५२ प्रवासी नाशिकला उतरले तर ६५४ प्रवासी येथून रवाना झाले.

सर्व सहा मार्गावरील सेवा या दिवशी सुरू होत्या. २०१५ ला कुंभमेळ्यादरम्यान या विमानतळावरून सेवा सुरू झाली होती, त्यानंतर आजपर्यंतचा हा एका दिवसात प्रवास करणाऱ्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

नाशिक विमानतळावरून सध्या इंडिगो कंपनीकडून हैदराबाद, इंदूर, गोवा, नागपूर, दिल्ली, बंगळूरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू असून तिचा लाभ कल्याण, ठाण्यापासून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांना होत आहे. १० सप्टेंबरला बंगळूरूसाठी सेवा सुरू झाल्याने एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांचा आकडा पार झाला आहे. यापूर्वी याच महिन्यात १४ सप्टेंबर रोजी १२३१ प्रवाशांनी नाशिक विमानतळावरून प्रवास केला होता.

मंगळवारी ऑपरेट झालेल्या फ्लाईट्स:
नाशिक विमानतळावरून मंगळवारी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर, गोवा, बंगळुरू या शहरांच्या फ्लाइटस् ऑपरेट झाल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790