Nashik Accident: महात्मानगर येथे कार झाडावर आदळून तरुण ठार
नाशिक (प्रतिनिधी): भरधाव कार झाडावर आदळल्याने २१ वर्षीय तरूण ठार झाला.
महात्मानगर भागात हा अपघात झाला असून, चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आदित्य देविदास पगारे (रा.आशिर्वाद रेसि.आरटीओ कॉलनी,बोधलेनगर पुणारोड) असे कार अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
- मुंबई नाका: मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार
- नाशिक: विद्यार्थ्यांना फ्लॅट शोधून देण्याच्या निमित्ताने प्रॉपर्टी ब्रोकर्सने घातला लाखोंचा गंडा
- नाशिककरांनो 01 डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेटसक्ती; कारवाई पुन्हा जोर धरणार !
- नाशिकमध्ये दुकान विकत घ्यायचंय ? इथे क्लिक करा !
पगारे मंगळवारी (दि.२२) रात्री मित्र चैतन्य संजय विसावे याच्या समवेत कारमधून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. चालक विसावे याच्या जवळ बसून तो महात्मानगर येथून एमएच १५ एएक्स ०११४ या कारमधून एबीबी सर्कलच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. सिक्स सिग्मा हॉस्पिटल भागात भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. चालकाचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात पगारे याच्या डोक्यास मार लागून नाका तोंडातून रक्त आले होते. गंभीर अवस्थेत कुटूंबियांनी त्यास तात्काळ सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना डॉ.सनी खुने यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790