नाशिक मध्यतून भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांचा विजय ! विजयाची हॅट्रीक…!

नाशिक (प्रतिनिधी): संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी देखील पुन्हा एकदा आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

नाशिक मध्यतून देवयानी फरांदे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. देवयानी फरांदे १ लाख ५६८९ मते मिळाली असून त्यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांचा पराभव केला. वसंत गीते यांना ८७ हजार ८३३ मते मिळाली आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790