नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात शासनाने भूमिका जाहीर करत लोकसेवा आयोगामार्फत परिपत्रक काढत विविध परिक्षांसंदर्भात सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. ११ आक्टोबरला महाराष्ट्र लोकसेवा अयोग २०२० च्या परीक्षा होणार असल्याची शक्यता आहे.
वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असून तेव्हाच्या परिस्थतीनुसार बदलही होऊ शकतो. एमपीएससीतर्फे जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार राज्य सेवा आयोग पूर्व परीक्षा २०२० ही सप्टेंबरला होणार होती. त्या ऐवजी सुधारित वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही अगोदर जाहीर केल्याप्रमाणे ०१ नोव्हेंबरलाच घेण्याचा आयोगाचा विचार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ही ११ ऑक्टोबरऐवजी २२ नोव्हेंबरला घेण्याचे ठरविले आहे .
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790