अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल…!

नाशिक – (विशेष प्रतिनिधी): नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून आज (ता. ११) महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.  संपुर्ण कर्नाटक,गोवा आणि आंध्र प्रदेशचा भाग व्यापणाऱ्या मॉन्सूनने हर्णे, सोलापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर शनिवारपर्यंत (ता. १३) राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे. 

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. गुरूवारी मोठी मजल मारणाऱ्या वाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, तेलंगणा, दक्षिण ओडीशा, बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे. तर ईशान्य भारतातून पुढे चाल करत, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही राज्ये संपुर्णपणे व्यापून, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयाच्या काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

गुरूवारी (ता.११) अरबी समुद्रावरून मोठा टप्पा पार करून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. नैर्ऋत्येकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह मजबूत होत असल्याने कोकण,मध्य महाराष्ट्रात आज (ता.११) पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. विदर्भ तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790