नाशिक: श्री साक्षी गणपती मंदिर येथे ५०० महिलांचे रविवारी सामूहिक अथर्वशीर्ष पठण

श्री  साक्षी गणपती व ठेवा संस्कृतीचा या ग्रुपतर्फे आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सवानिमित्त विविध मित्र मंडळांकडून उपक्रम राबविले जात आहेत. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. तर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांवर भर आहे.

श्रीमंत श्री साक्षी गणपती मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ५०० महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण. रविवारी सकाळी ८ वाजता भद्रकाली देवी मंदिरापुढील श्रीमंत श्री साठी गणपती मंदिर येथे हे पठण केले जाणार असल्याची माहिती अंकुश पवार आणि पल्लवी पटवर्धन यांनी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

श्री साक्षी गणपती प्रतिष्ठान आणि ठेवा संस्कृतीचा यांच्या वतीने भव्य स्वरुपात सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण केले जाणार आहे. यावेळी आतापर्यंत किमान ३०० महिलांनी नोंदणी केली आहे. तर प्रत्यक्ष पठणावेळी ५०० महिलांची उपस्थित असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांच्या विविध ग्रुपशी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे त्यासाठी सोशल मीडियाद्वारे गुगल फॉर्म देण्यात आला असून तेथे नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बेकायदा गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा; तब्बल १८० सिलिंडर जप्त, दोघे ताब्यात !

नोंदणीसाठी गुगल फॉर्म:
श्रीमंत श्री साक्षी गणपती मंदिर येथील सामूहिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत असतो यंदा गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी सर्व बंधू भगिनी यांनी https://docs.google.com/forms/d/1mIKJKWqFDred85i7V hs6LHq5VLl kTCHtQ9EGI PXX5hs/edi t पूर्व नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790