नाशिक: राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांची 55 लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): सहा महिन्यांत रक्कम दामदुपट करून देण्याचे आमिष देत मुंबईतील एका दांपत्याने नाशिकमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष वैभव यादवराव देवरे यांची तब्बल ५५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी बारकू गवळी आणि रुची रवी गवळी ( दोघे रा. रूम नं.२००५, २० व माळा, डीकाय सोलस, फेरबंदर, घोडपदेव, मुंबई ३३) यांनी देवरे यांना २ जुलै २०२२ ते १३ जुलै २०२३ दरम्यान रकमेच्या गुंतवणुकीवर सहा महिन्यांत दामदुपट परतावा देण्याचे आमिष देवून ५५ लाख २५ हजार रुपये गुंतवायला सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानाधारित पीक नियोजनाचा अवलंब करावा

मात्र अपेक्षित मोबदला मिळाला नाही. देवरे यांनी वेळोवेळी गवळी दांपत्याचा पैशासाठी पाठपुरावा केला.

मात्र त्यांना कुठलीही रक्कम परत न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गवळी दांपत्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790