महास्वयम वेबपार्टलच्या वाढल्या अडचणी; तक्रार नोंदविण्याठी हेल्पलाईन सुरू

नाशिक (प्रतिनिधी): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन सुविधा घेतांना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी/ तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 18 सप्टेंबर 2023 पासून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

हेल्पलाईनचा टोल फ्रि क्रमांक 18001208040 हा आहे. असे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिक अनिसा तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

विविध लाभार्थी घटक जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते यांना नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावतीकरण करणे, रिक्त पदे अधिसूचित करणे, रिक्त पदास अनुसरून ॲप्लाय करणे, राज्यातील युवक व विद्यार्थी यांना करियर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाइन सेवा-सुविधा महास्वयंम पोर्टलवरून देण्यात येतात.

सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 अशी आहे. हेल्पलाईन टोल फ्रि क्रमांक 18001208040 वर उमेदवार, उद्योजक/ नियोक्ते, सर्व लाभार्थी घटकांनी आपल्या अडचणी व तक्रारीची नोंद करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिक अनिसा तडवी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790