राज्यात आजपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील वातावरण कोरडे होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे सोमवारपासून (दि. ३०) थंडीचा कडाका वाढणार आहे. रविवारी (दि. २९) राज्याच्या अनेक शहरांतील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण झाली होती. नाशिकमध्ये नीचांकी तापमान १५.४ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: जीएसटी गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई; सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा !

अफगाणिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे लेह, लडाख, काश्मीर भागात हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये किमान तापमान उणे ६ ते ७ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणामध्ये दाट धुके तयार झाले आहे. त्यामुळे आता ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गोळीबारप्रकरणी तडीपार खरातसह दोन विधिसंघर्षित बालके ताब्यात

४ जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता:
३ ते ४ जानेवारी रोजी पुन्हा नवीन पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने पुन्हा हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790