नाशिक (प्रतिनिधी): उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी परतली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे.
स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास असल्याने थंडी कमी-अधिक होत आहे. मंगळवारी जळगाव येथे राज्यातील कमी तापमानाची नोंद झाली आहे.
शनिवार दि.११ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे . दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अगदीच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा नवीन अंदाज जारी केला आहे. यामुळे शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ल्या महिन्यात हवामानात झालेल्या सततच्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
उत्तरेत अलर्ट: उत्तरेत शीतलहर असून बुधवारी, आयएमडी ने पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळचे धुके आणि थंड दिवसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर हिमाचलमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धुके आणि थंडीबाबत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
![]()


