नाशिक (प्रतिनिधी): राज्यात १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत बहुतांश भागात पावसाची उघडीप असेल. विदर्भात १३ ते १५ ऑक्टोबर असे ३ दिवस केवळ ढगाळ वातावरण आणि अगदीच तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, जालना, नांदेड, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत उघडीप असेल.
राज्यात १७ ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाळी वातावरण होण्याचा अंदाज आहे. परतीचा मान्सून अजूनही राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबारपर्यंत येऊन थबकलेला आहे. वाटचालीस अनुकूल वातावरण असले तरी प्रत्यक्षात तो प्रवाही होत नाही तोपर्यंत पाऊस पूर्ण परतला असे म्हणता येणार नाही. गारपीट होण्यासारखीही परिस्थिती नसल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


