नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवार (दि.२१) मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पंरतु, दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. यानंतर अखेर शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
येत्या सोमवारी म्हणजेच (दि. २७ मे २०२४) रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. तसेच दुपारी १ वाजता हा निकाल लागणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागातील जवळपास १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तसेच यावर्षी दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती.
या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.
https://mahresult.nic.in/
http://sscresult.mkcl.org/
https://sscresult.mahahsscboard.in/