Breaking

मोठी बातमी: दहावी बारावीच्या परीक्षा अखेर पुढे ढकलल्या

मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झालाय.. बारावीची परीक्षा आता मे महिन्याच्या अखेरीस आणि दहावीची परीक्षा जून महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलीये. या परीक्षाचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी हेदेखील स्पष्ट केलंय की सीबीएससी आणि आयसीएससी हे जे बोर्ड आहेत, यांच्याशी देखील परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तीन लाखांची लाच घेताना उपविभागीय अभियंत्याला रंगेहात अटक; सहकारी अभियंता फरार
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790