नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील सर्व शाळांना उद्यापासून (२१ एप्रिल) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून सुट्टीबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळं लवकर सुट्ट्या देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक अशा सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. या उष्माघाताचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना 21 एप्रिलपासून सुटटी जाहीर करण्यात येत आहे.
राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
![]()


