नाशिक (प्रतिनिधी): कोकण ते मध्य प्रदेशापर्यंत एक द्रोणिय क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे. बहुतांश शहरांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस झाला. तसेच आगामी चार दिवसांत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, जालनासह विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


