पुणे (प्रतिनिधी): शहर हे शिक्षणाचे केंद्र आहे की, गुन्हेगारीचे केंद्र असा प्रश्न पडावा इतकी भयानक गुन्हेगारी या शहरात वाढली आहे. या संदर्भातील घटना रोजच उघडत होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुली, तरुणी यांनी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात तरुणीची वर चाकूने हल्ला करणे, विनयभंग करणे अशा घटना घडत असताना आता पुन्हा एक लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरात खळबळ उडाली आहे. एका पार्टीत तरुण मुलीला जबरदस्तीने मद्यपान करायला लावून लैगिंक अत्याचार करण्यात आले, तसेच तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढून पुन्हा वारंवार बलात्कार केल्याची भयानक घटनासमोर आली आहे.
ओळखीच्या तरुणांबरोबर पार्टीला गेली:
सध्याच्या आधुनिक काळात पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक तरुणांचा कल दिसत आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरात रात्री अशा अनेक पार्ट्या होत असतात, अशा एका पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन तरुणीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची वाईट घटनासमोर आली आहे.
चंदननगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षांच्या तरुणीने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मूळचा बीड जिल्ह्यातील असलेला एक तरुण सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. या ओळखीच्या तरुणांबरोबर ती पार्टीत गेली होती, तेथे तिला त्या तरूणांनी मद्य तथा दारु पाजली, त्यानंतर त्रास होत असल्याने तिला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला.
त्यामुळे या तरुणीला भितीमुळे काय करावे ते सूचे ना अखेर तिने मोठ्या धाडसाने पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आसिफ बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी रहीम शेख (वय-२६ ) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
मित्रानेच दिला धोका:
आसिफ हा ओळखीचा असल्यामुळे ही तरुणी पार्टीसाठी विमाननगर येथील एका क्लबमध्ये गेली होती. याच पार्टीत तिला दारु पिण्यासाठी आग्रह केला होता. त्यानंतर तरुणीने दारु प्यायला नकार दिला. मात्र जबरदस्तीने आग्रह करुन दारु पिण्यास लावली. त्यानंतर नशेत या तरुणीला एका हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि व्हिडीओ, फोटोदेखील काढले. वाईट गोष्ट म्हणजे हा भयानक प्रकार जुलै ते डिसेंबर २०२२ या ५ महिन्याच्या कालावधीत वाघोली येथील हॉटेलमध्ये घडला होता. तसेच आरोपीच्या भावाच्या घरी घडला देखील असा प्रकार होता. या सगळ्यानंतर या मुलाने तरुणीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकीदेखील या तरुणाने दिली. त्यानंतर तिला धमकी आणि फोटो दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे.