लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! आजपासून 1500 रूपये खात्यात जमा होणार !

मुंबई (प्रतिनिधी): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

हे ही वाचा:  २७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता...

डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. 

हे ही वाचा:  नाशिक: शेल्टर 2024:9000 कुटुंबांनी दिली प्रदर्शनास भेट; 60 कुटुंबांची झाली गृह स्वप्नपूर्ती

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.

किती महिलांना मिळणार लाभ?:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.  

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790