नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जिल्ह्यातील 40 केंद्रावर 18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश चाचणी परीक्षा-2025 साठी www.navodaya.gov.in व https://cbseitms.rcil.gov.in/nvs/index/Registration या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य व पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सादर करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, खेडगावचे प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 साठी इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 या कालावधीमधील असावा. नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात वर्ष 2024-25 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे, जाहिरात, माहितीपत्रक, प्रमाणपत्र आदी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी परीक्षा समन्वयक श्याम मदनकर- मोबाईल क्र. 9923615319 व आर. के. पराडे- मोबाईल क्र. 8999072775 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.