Weather Alert: अरबी समुद्रात ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Weather Alert: अरबी समुद्रात ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी): गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळानं मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे.

यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शाहीन चक्रीवादळानं ओमान देशाला जबरदस्त तडाखा दिला आहे.

यानंतर आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Amazon Great Indian Festival Best Selling Products.. Do Not Miss !

हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसांत या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यात 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. तर काही  ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संबंधित चक्रीवादळाचं नामकरण ‘जवाद’ (Cyclone Jawad) असं करण्यात आलं आहे.

दुसरीकडे आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर-दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी (Yellow alert) करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790