भारत सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर अशा काही खास श्रेणीतील गोष्टींच्या आयातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादनातून लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा गोष्टींच्या निर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना हीच परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशातून या बंदी घातलेल्या उत्पादनांचा सोर्सिंग देखील कठोर नियमांसह असेल.
नुकताच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गुरुवारी नोटीस बजावली. त्यानुसार, भारतात SN 8741 श्रेणी अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
HSN 8741 श्रेणी काय आहे ?:
अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर संगणक आणि सर्व्हर या श्रेणीत येतात. आतापर्यंत ही उत्पादने ऑर्डर करणे सोपे होते. मात्र, आयात केलेल्या उत्पादनांवर कर भरणे बंधनकारक होते.
हा निर्णय का घेण्यात आला ?:
एकीकडे सॅमसंग, डेल, एसर आणि अॅपल सारख्या कंपन्या चीनसारख्या देशातून भारतात लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व्हर पुरवतात. पण सध्या भारत सरकार लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या उत्पादनाला देशात प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यामुळे सरकारने लॅपटॉप, टॅबलेट आणि सर्व्हरच्या आयातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लॅपटॉप, टॅबलेट काही अटींसह परदेशातून आयात केले जाऊ शकतात, त्यानुसार लॅपटॉप आणि कॉम्प्युटर आयात करण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल जेव्हा ते विशिष्ट कारणासाठी वापरले जातात. याशिवाय वाणिज्य मंत्रालयाने आणखी एक अट घातली असून, त्यानुसार आयात केलेले लॅपटॉप आणि संगणक वापरल्यानंतर नष्ट केले जातील. त्यानंतर ते पुन्हा निर्यात केले जाईल. हे प्रतिबंधित लॅपटॉप आणि संगणक मागवण्यासाठी खास लायसन्स देखील घ्यावं लागेल.