शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगर येथील नाल्यावर लहान पूल बांधून रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे गुरूवारी, ९ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
उंटवाडीतील कर्मयोगीनगर भागात नैसर्गिक नाला आहे. पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, ब्लूबेल इमारत परिसर, खोडे मळा, बडदेनगर भागातील नागरिक या नाल्यावरील रस्त्याचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात. सध्या या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.
नाल्यावरील रस्ता दबल्याने कमकुवत झाला आहे. पायी जाणारे नागरिक, चारचाकी-दुचाकी वाहनांची येथून रात्रंदिवस वर्दळ असते. कमकुवत रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. जास्त पाऊस आल्यास नाल्यावरील हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. या नाल्यावर लहान पूल बांधून रस्त्याची दुरूस्ती करावी, रस्ता सुस्थितीत आणावा, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, अशोक पाटील, संजय टकले, दिलीप दिवाणे, विनोद पोळ, दीपक दुट्टे, मगन तलवार, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, साधना कुवर, उज्ज्वला सोनजे, धवल खैरनार, मीना टकले, कांचन महाजन, संगिता देशमुख, सचिन राणे, शैलेश महाजन, अनिकेत पाटील, आशुतोष तिडके, राहुल कदम, विजय कांडेकर, डॉ. राजाराम चोपडे, राहुल काळे, मंदार सडेकर, बापू आहेर, डॉ. शशिकांत मोरे, ज्ञानेश्वर महाले, बन्सीलाल पाटील, सचिन जाधव, राहुल कदम आदींसह नागरिकांनी केली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना याबाबतचे निवेदन गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी देण्यात आले.