तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

जमातने गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हा कार्यक्रम भारतातील कोरोनाव्हायरसचे केंद्र झाले आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तब्लिगी परिषदेतने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या परिषदेत देशातील विविध राज्यांतली आणि परदेशातली लोकं उपस्थित होती. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या परिषदेमुळे तब्बल 9 हजार लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. या परिषदेस किमान 7 हजार 600 भारतीय आणि 1 हजार 300 परदेशी लोक उपस्थित होते असा अंदाज वर्तवला जात आहे.

जमातने गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हा कार्यक्रम भारतातील कोरोनाव्हायरसचे केंद्र झाले आहे. तब्लिगी जमातमधील सदस्यांची ओळख अद्याप सुरू झाल्यामुळे सदस्यांची संख्याही वाढू शकते. देशभरातील अन्य जमात देशातील 1 हजार 306 सदस्यांची ओळख पटली जात आहे. गृहमंत्रालयाने एकत्रित केलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपर्यंत 1 हजार 051 लोकांना अलग ठेवण्यात आले आहे. 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

तब्लिगी जमातमधील 7 हजार 688 कार्यकर्त्यांची ओळख केली जात आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील सर्वात जास्त 190, आंध्र प्रदेशातील 71, दिल्लीत 53, तेलंगणामध्ये 28, आसाम 13, महाराष्ट्रातील 12, अंदमानमध्ये 10, जम्मू-काश्मीर 6, गुजरात आणि पुडुचेरीमधील प्रत्येकी एकाचा शोध घेण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790