नाशिक: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिकमध्ये !

नाशिक (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीत तरी यश मिळावे यासाठी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २५) सातपूर येथील हॉटेल डेमोक्रोसित होत आहे. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपाला यश मिळण्यासाठी शाह हे रणनीती आखतील. दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत बैठक चालेल.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

पक्ष संघटनात्मक बाबींवर मंथन करताना मतदारसंघनिहाय विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये संभाव्य निवडणुकीत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः शाह हे मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यभर विभागस्तरावर बैठकाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पाऱ्यात घसरण, थंडीचा जोर वाढला; नाशिकचे किमान तापमान 12.4 तर, निफाड 10.9 अंश सेल्सियस

बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र निवडणूकप्रमुख रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790