अभिमानास्पद: आपल्या नाशिकमध्येच तयार होताय पीपीइ किट्स !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी संभाळणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीइ किट्स सध्या नाशिकमध्ये तयार होत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकमधील अमोल चौधरी या युवा उद्योजकाला पीपीइ किट्स तयार करण्याची परवानगी दिली आहे.

येथे दररोज दोन हजार किट्स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यासाठी केली जात आहे. याआधी अमोल चौधरी हे विविध प्रकारचे गणवेश, सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस, भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते. मात्र कोरोना आजाराच्या संकट काळात रुग्ण सेवा देणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स” (पीपीइ किट्स) परिधान करणे आवश्यकता आहे, याबाबत सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो. सद्यस्थितीत राज्यासह देशात अशा किटचा मोठ्या प्रमाणात वर तुटवडा भासत आहे, एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे. डॉक्टरांना दिवसभरात किमान दोन पीपीइ किट्स वापरावी लागतात, अनेक डॉक्टर्स स्वखर्चाने हे किट्स खरेदी करण्यास तयार आहेत.

देशात मोठ्या प्रमाणात पीपीइ कीट्सची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. मात्र अमोल चौधरी या उद्योजकाने  सर्व प्रकारची वाहतूक आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही पूर्णपणे बंद असताना त्यांनी यासाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचा पीपीइ किट्स नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत आहे. देशातील काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने ही पीपीइ किट्स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे.

पीपीइ किट्स तयार करताना येथील कामगारही घेतात दक्षता

राज्य शासनाने नाशिकचे अमोल चौधरी यांना पीपी किड्स निर्मितीची परवानगी दिली असून त्यांनी आपल्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सरकारच्या नियमानुसार पीपीइ किट्स निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पीपीइ किट्स निर्मिती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कामगारांना अत्यावश्यक वाहतुकीचा परवाना दिला असून अवघ्या सातशे पन्नास रुपये किमतीत पीपीइ किट्स निंर्मिती केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790