घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून ‘इतक्या’ रुपयांनी महागले

नवी दिल्ली। दि. ७ मार्च २०२६: अमेरिका- इराणमधील युद्धाची झळ आता भारतीय ग्राहकांनाही बसणार असून सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये आणि १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ केली आहे. नवे दर ७ मार्चपासून लागू होतील. नाशिकला ८५६.५० रुपयांत मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर आता ९१६.५० रुपयांना मिळेल. यामुळे

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विवाहितेवर अत्याचार प्रकरणी फरार संशयिताला कन्नड येथून अटक

पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये होईल. तर, व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,७६४ रुपयांवरून १८८३ रुपये होईल.

घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत शेवटच्या वेळी ८ एप्रिल २०२५ रोजी ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. तेव्हापासून किमती स्थिर होत्या. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत गेल्या महिन्यात १ फेब्रुवारी रोजीच ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790