नाशिक: लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला लाखोंचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): तुमच्या पतीच्या नावे लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून नाशिक मधील एका वयोवृद्ध महिलेची तब्बल चार लाख 38 हजार दोनशे रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात व्हाट्सअप क्रमांकसह विविध बँक खाते क्रमांकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

सरला गर्ग (वय 80, रा. पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 3 ते 20 एप्रिल 2023 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून एक व्हाट्सअप क्रमांक तसेच एचडीएफसी बँक खातेदार व ईमेल आयडी धारक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

भामट्याने व्हाट्सअप क्रमांक द्वारे वृद्ध महिलेशी संपर्क करून लॉटरीचे आमिष दाखवले तसेच लॉटरीची रक्कम वर्ग करण्यासाठी तुम्ही बँक खात्यात रक्कम जमा करावी, असे सांगितले. त्यानुसार महिलेने पैसा जमा के, मात्र पैसे जमा करूनही लॉटरी रक्कम मिळाली नसल्यामुळे आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790