नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या कारवाईची दैनंदिन माहितीही घेण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सभा, समारंभ तसेह लग्न सोहळ्याला शंभरपेक्षा जास्त उपस्थिती असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोरोना नियंत्रणासाठी नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. मात्र नियमांतून सुट दिल्यासारखे लोकं रस्त्यांवर गर्दी करत आहेत. एवढच नाही तर आता अनेक लोकांनी मास्क घालणेही बंद केले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व नियम न पाळल्यास आता कारवाई करण्यात येणार आहे.