दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान !
नाशिक (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 खासदारांना संधी देण्यात आलीय. त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार भारती पवार यांचाही समावेश करण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे भारती पवार यांनी केंद्रीय मंत्रीपदासाठी अचानक नाव समोर आलं.
त्यानंतर काही वेळापूर्वी जाहीर झालेल्या 43 जणांच्या यादीत भारती पवार यांचं नाव पाहायला मिळालं. याबाबत भारती पवार यांना विचारला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.
नेमक्या कोण आहेत भारती पवार ?:
भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे. स्वत: डॉक्टर असल्यानं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं. त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मतं मिळवली. राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केल्यानं ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्यानं दिंडोरीत ताकद वाढली. मुंबईत भाजप प्रवेशांनंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असं सांगितलं. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केलं.