Dating Appचा पासवर्ड मिळविण्याच्या नादात पोलिस अधिकाऱ्याला 2 लाखाचा गंडा

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Dating Appचा पासवर्ड मिळविण्याच्या नादात पोलिस अधिकाऱ्याला 2 लाखाचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): डेटिंग अॅपचे लॉग- इन पासवर्ड मिळविण्याच्या प्रयत्नात सहायक पोलिस निरीक्षकाला अज्ञात सायबर भामट्याने तब्बल दोन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षकाने मोबाईलमध्ये एक डेटिंग ॲप इन्स्टॉल केले होते. सदर अॅप अनइन्स्टॉल झाल्याने त्यांनी पुन्हा लॉग इन व पासवर्ड मिळविण्याचा प्रयत्न केला असता, त्यात अपयश आल्याने त्यांनी गुगल सर्चची मदत घेत कस्टमर केअरचा नंबर मिळविला.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

संबंधितांशी संपर्क केल्यावर त्यांना गेल्या २६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा ते सव्वा नऊ या दरम्यान इंटरनेटच्या माध्यमातून अज्ञात संशयिताने ८९१०६७४९२९ व ९३३७०३८८४९ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. सदर अधिकाऱ्याला अॅपचे लॉग- इन करून देण्याच्या बहाण्याने त्यांना मोबाईलमध्ये एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

हे अॅप डाऊनलोड केल्यावर संशयितांनी ५ रुपये शुल्क भरावयास सांगितले. ५ रुपये भरल्यानंतर, एनी डेस्क अॅपच्या माध्यमातून बँक खात्यातील माहिती भामट्यांनी अधिकाऱ्याच्या मोबाईलमधून घेतली. सर्वच अॅक्सेस मिळाल्याने भामट्याने या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून तीन तासांत दोन लाख रुपये दुसऱ्या खात्यांत वर्ग केले.

दरम्यान, बँक खाते रिकामे झाल्याचा मेसेज अधिकाऱ्याला मिळताच धक्का बसला. त्याने नाशिक शहर सायबर पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

‘Any Desk’ ॲप धोकादायक:
ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून कोणताही कस्टमर केअर नंबर शोधू नये. त्यापेक्षा संबंधित कंपनीच्या अधिकृत लेटरहेड, पोस्ट कार्ड, वा बिल किंवा हार्ड कॉपीवरून संपर्क नंबर मिळवावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत एनी डेस्क हे अॅप डाऊनलोड करू नये. हे ॲप डाऊनलोड केल्याने फसवणुकीचा धोका वाढतो, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790